परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा.सुनील तटकरे यांच्या सहमतीने परभणी ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी रोहण सामाले यांची निवड करण्यात आली आहे. सामाले यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, आ.बाबाजानी दुर्राणी, राजेश विटेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिले आहे.
रोहण सामाले हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी विधानसभेचे काम पाहत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक शिबिरे, विविध स्पर्धा, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
त्यांच्या कामाचा आढावा बघून परभणी युवक जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड केली. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, आमदार यांनी कौतुक केले आहे.