26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeउद्योग‘रिलायन्स रिटेल’मधील ४२ हजार जणांना डच्चू

‘रिलायन्स रिटेल’मधील ४२ हजार जणांना डच्चू

मुंबई : वृत्तसंस्था
वाढत्या मंदीच्या बातम्यांदरम्यान एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. देशातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजनं गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात खर्चात कपात केली. कंपनीनं आपल्या वार्षिक सर्वसाधारण अहवालात मनुष्यबळ कमी करण्याची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण कर्मचा-यांची संख्या ३,८९,००० होती, ती २०२४ मध्ये ३,४७००० वर आली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये रिलायन्स समूहानं खर्चात सर्वाधिक कपात केली.

आरआयएलच्या ताज्या वार्षिक रिपोर्टनुसार, नवीन नोकरभरतीची संख्या एक तृतीयांशने कमी करून १,७०,००० करण्यात आली आहे. समूहाच्या कामगार कपातीचा मोठा भाग त्यांच्या रिटेल व्यवसायात होता, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आरआयएलच्या २,०७,००० कर्मचा-यांच्या संख्येच्या सुमारे ६० टक्के होता. ही संख्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २,४५,००० होती. जिओने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कर्मचा-यांची संख्या ९५,००० वरून ९०,००० पर्यंत कमी केली आहे.

कर्मचा-यांना मिळणा-या सुविधांच्या खर्चात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि ती वाढून २५,६९९ कोटी रुपये झालीये. म्हणजेच कंपनीवर इतक्या खर्चाच अतिरिक्त भार आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR