26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूररुध्दा येथे वृध्द शेतक-याचा खून; पत्नी गंभीर जखमी

रुध्दा येथे वृध्द शेतक-याचा खून; पत्नी गंभीर जखमी

अहमदपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील हगदळ शिवारात रात्री रुध्दा येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षे असलेल्या वृद्ध शेतक-याचा रात्रीच्या वेळी खून झाल्याची घटना घडली आहे तर पत्नी मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांसमोर यासह अन्य अनेक घटनांचा छडा लावणे आव्हानात्मक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावसाहेब कडाजी केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे हे नॅशनल हायवे ३६१ च्या पूर्वे बाजूस हगदळ शिवारात आपल्या शेतात मुक्कामी आखाड्यावर जनावरांसह राहत होते. ते मूळचे रुध्दा (ता. अहमदपूर) येथील रहिवासी असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती ग्रामस्थाकडून देण्यात आली आहे. अचानक या वृद्ध दांपत्यावर अनोळखी व्यक्तीकडून हल्ला झाला असून यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले. तर उषाबाई केंद्रे या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या. सकाळी उषाबाई केंद्रे या शुध्दीवर आल्यानंतर त्या कशातरी चालत- चालत नॅशनल हायवेवर आल्या व तेथील उपस्थित असलेल्या नागरिकांना रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली असता नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारांसाठी दाखल केले व अहमदपूर पोलीस ठाण्याशी कळवले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. या दुर्दैवी घटनेचा तपास करण्यासाठी लातूरहून फॉरेन्सिकची टीम व श्वानपथकास पाचारण करुन तपास केला जात आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे कार्य वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर किनगाव पोलीस ठाण्याचे भाऊसाहेब खंदारे हेही उपस्थित झाले आहेत. या शहरात अनेक गंभीर घटना सतत घडत आहेत. कोणालाही पोलिसांची भीती राहिली नाही. शहरात चोरीच्या, भांडणाच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद अजूनपर्यंत झाली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR