21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयरुपया ढासळला, गंगाजळीत घसरण

रुपया ढासळला, गंगाजळीत घसरण

मुंबई : प्रतिनिधी
देशाच्या परकीय गंगाजळीत उतार कायम असून ६ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात ती ३.२३ अब्ज डॉलरने घसरून ६५४.८५ अब्ज डॉलरपर्यंत म्हणजेच पाच महिन्यांपूर्वीच्या नीचांकपदी गेली. प्रतिडॉलर ८५ च्या पातळीपर्यंत गडगडता रुपया यामागे कारणीभूत आहे.

भांडवली बाजारातून परकियांच्या गुंतवणुकीची निरंतर सुरू असलेली माघार आणि अमेरिकेतील घडामोडींनी डॉलरने कमावलेली सशक्तता यातून रुपयाच्या विनिमय मूल्यात आणखी घसरण झाली असून त्याने सध्या प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. परिणामी घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सक्रियपणे हस्तक्षेप म्हणून गंगाजळीतील डॉलरची विक्री केली जात असल्याचा विश्लेषाकांचा दावा आहे.

याआधी २७ सप्टेंबर २०२४ ला संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळी ७०४.८८ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र आयातदारांकडून होत असलेल्या मागणीमुळे उच्चांकी पातळीपासून आजपावेतो त्यात सुमारे ५० अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. सरलेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठादेखील कमी होऊन ६६.९३ अब्ज डॉलरवर घसरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR