रेणापूर : प्रतिनिधी
सोमवारी दि १० जून रोजी रात्री झालेल्या दमदार पावसाने रेणापूर शहरातील संजय नगर, राजेनगर, बसस्थानकच्या पाठीमागील वस्तीत व गाव भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या दमदार पावसामुळे शहरात सर्वत्रे पाण झाल्याने जागो जागी तळ्याचे स्वरूप आले होते.या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त कुटुंबाकडून करण्यात येत आहे. सोमवारी दि. १० रोजी सांयकाळी आचानक काळेकुट आभाळ दाटुन येत विजेचा कडकडाटासह पाऊस झाला. सायंकाळपासुन ते मंगळवारी सकाळपर्यंत दमदार पाऊस झाल्याने रेणापूर शहरात अनेक भागात नाल्या तुबल्याने या भागातील अनेक घरात पाणी शिरले.
बसस्थानक समोरील संजय नगर, राजे नगर भागात व बसस्थानक पाठीमागील वस्तीतील घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी वस्तूंसह अन्न धान्याचे नुकसान झाले. अनेक कुटुंब तर घरात पाणी घुसत्याने चक्क रस्त्यावर येऊन थांबले तर अनेक कुंटुबानी रात्र जागून काढली तसेच शहरातील गाव व सकल भागात असलेल्या वस्त्यातील घरात, चांदणी चौक, पोलीस ठाण्यासमोरील भाग, बाजारपेठेतील दत्त मंदीर,येलम गल्ली (खंडोबा मंदीर), मुस्लीम स्मशानभुमी या भागात पाणी वाहत होते.
याची माहिती मिळताच नायब तहसिलदार श्रावण उगले मुख्याधिकारी मंगेश शिंदे, तलाठी विकास बुबणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम, शफीभाई शेख, अजीम शेख, पाशाभाई शेख, पत्रकार रफीक शेख-शिकलकर नगरपंचायचे अभियंता विशाल विभूत, स्वच्छता निरक्षिक स्ध्दििार्थ आचार्य, कर्मचारी अकुंश गायकवाड, नवनाथ पांचाळ, शिवराज कसबे आदींनी याची दखल घेत पाणी तुंबलेल्या भागात जेसीबीच्या साह्याने संजयनगर, बाजारपेठ, यासह अन्य ठिकाणी तुबलेल्या नाल्या वाहत्या केल्या.
एकदरीत या झालेल्या पावसामुळे संजय नगर मधील नाल्या शेजारी असलेल्या घरात पाणी घुसल्याने घरातील अन्न धान्य कपड्यासहह्यांससारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असुन प्रशासनाने नुकसानीचा पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकातून केली जात आहे.