रेणापूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागात ही शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून आर्थिक प्रगती करीत आहेत . अशा शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी व इतर ही शेतक-यांना प्रेरणा मिळावी या उद्येशाने रेणापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मालतारण योजनेचा शुभारंभ व तालुका स्तरीय शेतकरी मेळावा मंगळवार दि . ९ रोजी सकाळी १० वाजता बाजार समिती च्या सभागृत आयोजीत करण्यात आला आहे .
या मालतारण योजनेचा शुभारंभ जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . या कार्यक्रमास माजी आ. त्र्यंबक भिसे, माजी आ. वैजनाथराव शिंदे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे- व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अॅड प्रमोद जाधव , कॉंंग्रेसचे शहराध्यक्ष अॅड मतीन अली सय्यद यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. तरी तेव्हा शेतक-यांंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रेणापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड शेषेराव हाके व संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.