27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूररेणापूर येथील चौकांनी घेतला मोकळा श्वास

रेणापूर येथील चौकांनी घेतला मोकळा श्वास

रेणापूर : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चांदणी चौक या रस्त्यावर व्यापा-यांनी अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने मंगळवारी दि ६ ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात  अतिक्रमणाची मोहीम राबवित चौक व रस्ता खुला केला. त्यामुळे या चौकाने मोकळा श्वास घेतला असून अतिक्रमण हटविण्यात आल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे .
रेणापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व चांदणी चौक हे मुख्य चौक आहे. या दोन्ही चौकात नागरीकांची नेहमी वर्दळ असते मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चांदणी चौकापर्यंत जाणा-या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला व आठवडी बाजाराला आडथळा निर्माण होत होता तसेच या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन धारकासह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे  दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चांदणी चौकपर्यंत जाणा-या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने दि १२ जुलै रोजी संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष शिंंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. नगरपंचायत प्रशासनाने सदरचे अतिक्रमण काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते .
नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाने संबधित व्यवसायिकांना नोटीस देण्यात आली होती. या नोटीशीद्वारे आपले अतिक्रमण दि. ५ ऑगस्ट पर्यंत  काढण्यात यावे अन्यथा प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यात येईल असे बजावले होते मात्र काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील अतिक्रमण न काढल्याने नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मंगेश शिंंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकांने  पोलीस बंदोबस्तात  मंगळवार दि ६ रोजी अतिक्रमण काढण्याची   मोहिम सुरु करून हे अतिक्रमण काढले. ही मोहीम दिवसभर सुरू होती.
या अतिक्रमण मोहिमेत मुख्य अधिकारी शिंदे यांच्यासह बांधकाम विभागाचे नगर अभियंता मंगेश देशमुख, पाणीपुरवठा अभियंता विशाल विभुते, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानदेव दहिफळे, लेखापाल अमोल बाजुळगे, स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ आचार्य, माधव भुतकर, विशाल इगे, बाळासाहेब भोसले अंकुश गायकवाड, सुभाष पोटे, भारत शिंदे, नवनाथ पांचाळ, हिरामण मस्के, शुभम शिंदे, शिवराज कसबे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR