21 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeलातूरलातुरात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न

लातुरात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न

लातूर : प्रतिनिधी
लातूररात कायदा सुव्यवस्था कायम राहावी, येथील सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी येथील नेतृत्वाने सातत्याने प्रयत्न केले आहेत, त्यामुळेच येथील उद्योग व्यवसाय भरभराटीला आलेला आहे. त्यातून लातूर शहर कायम प्रगतीपथावर राहण्यास मदत झाली आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
लातूर एमआयडीसी परिसरातील अजिंक्य सेल्स कॉर्पोरेशन, कृष्णा ट्रेडिंग कंपनी येथे संतोष तोष्णीवाल मित्र मंडळाच्या वतीने दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित व्यापारी सुसंवाद बैठकीस उपस्थित राहून सर्व व्यापारी मित्रांसोबत संवाद साधला या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललित भाई शहा, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, वामन धुमाळ, नागेश बावगे, सय्यद युसुफ, ईश्वर बाहेती, चंदुलाल बलदवा, आनंद बाहेती, राजेश तोष्णीवाल, कन्हैयालाल जंत्रे, परमेश्वर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, प्रमोद मुंदडा, डॉ.  हंसराज बाहेती, रतन बीदादा, सीए  प्रकाश कासट, विष्णू भुतडा, हुकुमचंद कलंत्री, ओमप्रकाश बाहेती आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तोष्णीवाल  कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, लातूररातील सलोख्याची ती परंपरा पुढेही चालू राहावी यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत्. या कामी जाणकार मंडळींचा कायम पाठिंबा आणि आशीर्वादही मिळत आले आहेत, ते पुढेही मिळत राहतील, असा विश्वास या प्रसंगी  व्यक्त्त केला. संपूर्ण देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय इतर राज्यात स्थलांतरित होत आहेत,  कधी नव्हे ते राज्यत गुन्हेगारी वाढते आहे. राज्यातील जनतेच्या भविष्याच्या दृष्टीने या बाबी धोकादायक ठरत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यात आता सत्तांतराची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादनही याप्रसंगी बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, वामन धुमाळ, नागेश बावगे, सय्यद युसुफ, संतोष तोष्णीवाल, सीए प्रकाश कासट, संजय पाटील खंडापूरकर यांनी मनोगत व्यक्त्त केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश तोष्णीवाल यांनी केले तर शेवटी आभार संतोष तोष्णीवाल यांनी
मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR