नळेगाव : वार्ताहर
लातूर- उदगीर मार्गावरील नळेगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे चाकूरचे तहसीलदार नरंिसग जाधव यांनी कळविले आहे.
अहमदपूर उपविभागीय महसूल अधिकारी मंजुषा लटपटे आणि चाकूरचे तहसीलदार जाधव यांनी पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. पर्यायी वाहतुकीसाठी लातूर- उदगीर मार्गावरील वाहतुकीसाठी लातूर-चाकूर-उजळंब-कबणसांगवी-उदगीर रस्ता- मार्गे उदगीर (येरोळमोड जवळ), लातूर-चाकूर -उजळंब- रोहिना -हेर कुमठा -तोंडारमार्गे उदगीर, लातूर-लातूर रोड -सावरगाव -भाटसांगवी- अंजनसोंडा- उदगीर तर शिरूर अनंतपाळमार्गेही लातूर ते उदगीर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.