लातूर : प्रतिनिधी
आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारीत दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. या पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत ३० आगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व २ हजार १४२ मतदान केंद्रावर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथेही मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीनुसार लातूर जिल्ह्यात २० लाख १६ हजार ९९० मतदारांचा समावेश आहे. यामध्ये १० लाख ५५ हजार २५२ पुरुष मतदार आणि ९ लाख ६१ हजार ६७६ महिला मतदार आणि ६२ इतर मतदारांचा समावेश आहे. २३४-लातूर ग्रामीण मतदारसघांत १ लाख ७४ हजार ९२ पुरुष मतदार, १ लाख ५६ हजार १०५महिला मतदार आणि इतर ३ असे एकूण ३ लाख ३० हजार २०० मतदारांचा समावेश आहे.
२३५-लातूर शहर मतदारसघांत २ लाख ३ हजार ३७४ पुरुष मतदार, १ लाख ९० हजार ८८७ महिला मतदार आणि इतर २६ असे एकूण ३ लाख ९४ हजार २८७ मतदार, २३६-अहमदपूर मतदारसघांत १ लाख ८० हजार ५२९ पुरुष मतदार, १ लाख ६३ हजार ८७३ महिला मतदार आणि इतर १ असे एकूण ३ लाख ४४ हजार ४०३ मतदार, २३७-उदगीर मतदारसघांत १ लाख ६५ हजार ८११ पुरुष मतदार, १ लाख ५३ हजार ६० महिला मतदार आणि इतर १९ असे एकूण ३ लाख १८ हजार ८९० मतदार समाविष्ट आहेत. २३८-निलंगा मतदारसघांत १ लाख ७२ हजार ६५ पुरुष मतदार, १ लाख ५६ हजार १ महिला मतदार आणि इतर ९ असे एकूण ३ लाख २८ हजार ७५ मतदार आहेत, तसेच २३९-औसा मतदारसघांत १ लाख ५९ हजार ३८१ पुरुष मतदार, १ लाख ४१ हजार ७५० महिला मतदार आणि इतर ४ असे एकूण ३ लाख १ हजार ३५ मतदार आहेत.
छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यांदीत असेल, तरच त्यांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. त्यासाठी आपल्याकडे मतदार ओळखपत्र असले, तरीही मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी ँ३३स्र२://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ अॅपचा वापर करावा. तसेच प्रसिध्द करण्यात आलेली अंतिम मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान मदत केंद्र येथे वोटर हेल्प सेंटर येथे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज स्वीकारले जातील. तसेच मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठीकिंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास ँ३३स्र२://५ङ्म३ी१२.ीू्र.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट देता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आवाहन केले आहे.