लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदासाठी घेण्यात येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी परीक्षा आज सलग दुस-या दिवशी सुरु ठेवण्यात आली. पोलीस भरतीच्या दुस-या दिवशी ७७४ उमेदवार व पहिल्या दिवशी राहिलेला एक उमेदवार असे ७७५ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. मैदानी चाचणी प्रक्रिया करिता हजर ४६८ उमेदवारांपैकी ३७८ उमेदवार पुढील मैदानी चाचणीसाठी पात्र झाले. गुरुवारच्या मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित उमेदवारांमध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांचा समावेश होता. महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीमध्ये ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळा फेक या ३ मैदानी चाचण्या आहेत. मैदानी चाचणी प्रक्रिया दि. २४ जूनपर्यंत चालणार आहे.