23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरलातूर येथे शेतक-यांच्या मुलींसाठी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृह

लातूर येथे शेतक-यांच्या मुलींसाठी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृह

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर, शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात असले तरी, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलींना शहरात येऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गूळ मार्केट येथे शेतक-यांच्या मुलींसाठी एक सुसज्ज राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृह उभारण्यात आले आहे. या वसतीगृहाचे लोकार्पण आज दि. ११ ऑक्टोंबर रोजी  माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरकडून शेतक-यांच्या मुलीसाठी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृह गुळमार्केट, लातूर येथे उभारण्यात आले आहे. या वसतिगृहात मुलींना राहण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत प्रकाश व्यवस्था चांगली आहे,  अभ्यासिका, दर्जेदार फर्नीचर  आणि खुली हवा आहे. यासोबतच, मुलींना अभ्यासासाठी शांत  वातावरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR