19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरलातूर रोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाची तरतूद रखडली

लातूर रोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाची तरतूद रखडली

जळकोट : ओमकार सोनटक्के
लातूर रोड जळकोट ते बोधन हा १३४ किलोमीटरचा रेल्वे मार्ग सन २०१६ यावर्षी मंजूर झाला होता. या रेल्वे मार्गाच्या पहल्यिा सर्वेसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला होता . यानंतर हा रेल्वे मार्ग मंजूर होऊन आठ वर्षे झाली तरीही रेल्वे मार्गासाठी लागणा-या भूसंपादनाचे काम रखडले आहे. मार्गासाठी राज्य सरकारने वाटा उचलणे गरजेचे आहे.  या अनुषंगाने राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पाठपुरावा करणार का, असा सवाल लागनिकांतून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारने हा रेल्वे मार्ग मंजूर केला असला तरी महाराष्ट्र शासनाने या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी आर्थिक वाटा उचलणे गरजेचे आहे  मात्र अद्यापही राज्य सरकारने या रेल्वेमार्गासाठी वाटा उचलला नसल्याची माहिती मिळाली आहे. अर्थ खाते हे अजितदादा पवार यांच्याकडे असून ते जळकोट तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या  पाठपुराव्याची गरज आहे.  हा रेल्वे मार्ग तेलंगणा तसेच महाराष्ट्र या दोन राज्यांमधून जात आहे. महाराष्ट्र सरकारने याकडे विशेष लक्ष घालून यासाठी निधीची तरतूद करून याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणे गरजेचे आहे. लातूर रोड -जळकोट – बोधन या रेल्वे मार्गाचे फायनल लोकेशन सर्व्हेचे काम पूर्ण झालेले आहे. या मार्गासाठी अंतिम रूप आले आहे .
येणा-या कालावधीते विधानसभेच्या निवडणुका होणार असून अगदी सात दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने जर या रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद केली व यास कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली तर रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू होऊ शकणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जळकोट तालुक्यातील डोंगरगाव येथे उच्च पातळी बंधा-याचे जलपूजन, शासकीय विश्रामगृह तसेच प्रशासकीय इमारती लोकार्पण होणार आहे. या ठिकाणी ते लातूर रोड जळकोट बोधन या रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा करतील अशी अपेक्षा जळकोटसह मुखेड बिलोली, नायगाव, चाकूर या तालुक्यातील नागरिकांना आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR