लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील रिंगरोड वरील पाच नंबर चौक ते खाडगाव चौक तसेच पाच नंबर चौक ते संविधान चौक, शिवाजी चौक या मार्गावरील बंद असलेले पथदिवे दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीव सुरु करावेत. तसेच बाभळगाव नाका, गरुड चौक याठिकाणी वाढती वाहतुकमुळे वाहतूक कोडी होत आहे येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सिग्नल बसवण्या बाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालीका आयुक्त आणि संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
लातूर शहरातील रिंगरोड वरील पाच नंबर चौक ते खाडगाव चौक तसेच पाच नंबर चौक ते संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर नागरीकांची मोठी वर्दळ असतानाही याठिकाणचे पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या मार्गावर सर्वत्र अंधार असतो. याचा वाहनचालकांना, नागरीकांना त्रास होत असून अंधारामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच बाभळगाव नाका, गरुड चौक याठिकाणीही वाहनांची कोंडी होत असून त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहन कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागत असून पायी चालणा-या नागरीकांना, परिसरातील दुकानदारांना याचा त्रास होत असल्याने याठिकाणी सिग्नल बसवणे आवश्यक आहे.
पथदीवे दुरुस्ती आणि सिंग्नल यंत्रणे बाबत विचार करुन रिंगरोड वरील पाच नंबर चौक ते खाडगाव चौक तसेच पाच नंबर चौक ते संविधान चौक, छत्रपती शिवाजो महाराज चौक या मार्गावरील बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरु करावेत व बाभळगाव नाका, गरुड चौक याठिकाणी सिग्नल बसवणेबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सुचना लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या आहेत.