लातूर : प्रतिनिधी
शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी लातूर शहरातील ३१ परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. सदर परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात पार पडणार आहे. त्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत २४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील डिपीडीसी सभाग्रहात बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाकडून २०२१ नंतर रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. १०.३० ते १ या सकाळच्या सत्रात ८ हजार १५६ उमेदवार २३ परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत., तर दुपारच्या सत्रात २.३० ते ५ या वेळेत ९ हजार ९९३ उमेदवार ३१ केंद्रावर परीक्षा देणार आहेत. या सर्व नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत २४ ऑक्टोबर रोजी घेतला जाणार आहे. या बैठकीस मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमीक, मुरूड डायटचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत. या परीक्षेसाठी ८ झोनल अधिकारी, ३५ सहाय्यक परिरक्षक, ३५ केंद्र संचालक, ४५० परिरक्षक, समवेक्षक शिक्षक पात्रता परीक्षेच्या कर्तव्यावर असणार असणार आहेत.