23.4 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeलातूरलातूरच्या आक्टोगन उद्योगात तब्बल १६ कोटी ७९ लाखांच्यावर फसवणूक

लातूरच्या आक्टोगन उद्योगात तब्बल १६ कोटी ७९ लाखांच्यावर फसवणूक

लातूर : प्रतिनिधी
येथील अतिरिक्त एमआयडीसी भागात ए-०१ येथे कार्यरत असलेल्या आक्टोगन फूड (सॉल्वंट) या उद्योगातील भागिदारांच्या बनावट अ‍ॅग्रीमेंट, ठराव, लेटरहेड, शिक्के, ई-मेल बनवून पाच जणांनी १६ कोटी ७९ लाख ७ हजार ६६६ रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घोटाळा कोटीवरचा असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
अतिरिक्त एमआयडीसी परिसरात ए-०१ येथे आक्टोगन फूड एलएलपी (सॉल्वंट) उद्योग आहे. या उद्योगातील भागीदारांच्या नावे बनावट अ‍ॅग्रीमेंट ठराव, आरटीजीएस, बनावट शिक्के, ई-मेल, बनावट लेटरहेड बनवून विविध वित्तीय संस्थांच्या अ‍ॅग्रीमेंटच्या ट्रेड लिमिट पैकी सोळा कोटी चार लाख सात हजार सहाशे साहसष्ठ रूपये शेअर्स प्रकरणात ३० लाख तसेच बुलडाणा अर्बन को. ऑप. बँकेत बनावट ठरावपत्र जोडून ४५ लाख रूपये असा एकूण १६,कोटी ७९ लाख ७ हजार ६६६ रूपयांची फसवणूक केली आहे. राहुल पन्नालाल कलंत्री, अतुल पांचाळ, सुधीर भुतडा, बद्री विशाल मुंदडा, रमेश चोपडा सर्व रा. लातूर यांच्या विरोधात किशोर शिवराज वर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत विश्वासघात, फसवणूक, आर्थिक घोटाळा, बनावट कागदपत्रं बनविणे, कट करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत असलेल्या आर्थिक गुन्हे विभागाकडून करण्यात येत आहे. एखाद्या खासगी कंपनीत सुमारे १७ कोटी रूपयांचा अपहार हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असावा असे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR