लातूर : सिध्देश्वर दाताळ
एसटी महामंडळाने लातूर जिल्ह्याला १०९ नविन ई बसेस एप्रिल -मे २०२४ महिन्यातच्या सुरुवातीला शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख आगारांना ई बसेस देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र जवळपास सहा महिने उलटून गेले तरी लातूर विभागाला एकही ई बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसटीच्या मोडकळीस आलेल्या भंगार बस चालवण्याचा कंटाळा आल्याने एसटी कर्मचारीही नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. एसटी बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने नव्या बसेसची प्रतिक्षा लातूरकरांना लागली आहे.
खासगी बसकडे धाव घेणा-या प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाच्या ताफ्यात विजेवर धावणा-या १०९ ई बसेस धावणार असल्याचे लातूर विभागाचे विभागीय अधिकार अश्वजित जानराव यांनी ३ मार्च २०२४ रोजी सागीतले होते. मात्र, यातील एकही बस लातूरकरांच्या वाटयाला अद्याप आलेली नाही. चार्जिग स्टेशनचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था आणि कर्मचा-यांचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे येथील प्रवाशांना किमान एक तरी वर्ष लातूरकरांना अलिशान बसची वाट पाहावी लागणार आहे. डिझेलवर चालणा-या गाड्यांचा खर्च कमी करण्यासाठी ई बसेस चालवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये या ई बसेसगाड्या दाखलही झाल्या; परंतु लातूर जिल्ह्यात अद्याप एकही ई बसेस मिळाल्या नाहित. येथील लातूर विभागातील उदगीर, औसा, निलंगा आगार ई बसेसचे चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्पात आहे. तर अहमदपूर आगारात मात्र स्टेशनचे काम संत गतिने चालू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी परिवहन महामंडळाला आणखी काही महिने घालवावी लागणार आहेत. डिसेंबर २०२४ अखेरेस तरी जिल्ह्यात ई बसेस सुरू होतील, अशी अपेक्षा लातूरकरांना होती. मात्र, परिवहन महामंडळाच्या कोणत्याही हालचाली नसल्याने अनखिन काहि दिवस तरी लातूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.