25.4 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरलातूरमधील सोयाबीन खरेदी ठप्प, संतप्त शेतक-यांचे ट्रॅक्टरसह आंदोलन

लातूरमधील सोयाबीन खरेदी ठप्प, संतप्त शेतक-यांचे ट्रॅक्टरसह आंदोलन

कोटा संपल्याची सबब, पण निम्मी खरेदीही नाही, शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक 
लातूर : प्रतिनिधी 
केंद्र सरकारने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. सोयाबीन खरेदीची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. परंतु लातूर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा कोटा संपला या सबबीखाली दि. २८ जानेवारी रोजी दुपारी अचानक पोर्टल बंद झाले आणि जिल्ह्यातील ५४ केंद्रांवरील सोयाबीन खरेदी ठप्प झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी सोयाबीन भरलेले ५० ते ६० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालायासमोर येऊन आपला रोष व्यक्त केला.
लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन झाले. सोयाबीनला योग्य भाव मिळावा., सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून शेतक-यांनी आंदोलन केले परिणामी केंद्र सरकारने जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरु केली. त्यासाठी जिल्ह्यात ५४ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. नोंदणी केलेल्या ५० टक्के शेतक-यांचीसुद्धा सोयाबीन खरेदी झालेली नसताना लातूर जिल्ह्याचा सोयाबीन खरेदीचा कोटा संपला, या सबबीखाली पोर्टल बंद करण्यात आले. परिणामी हजोरो शेतक-यांच्या सोयाबीनच्या गाड्या नाफेडच्या खरेदी केंद्रासमोर रांगेत उभ्या आहेत.
अचानक पोर्टल बंद झाल्याने जिल्ह्यातील ५४ केंद्रांवरील सोयाबीन खरेदी ठप्प झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी ५० ते ६० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यासमोर येत आपला रोष व्यक्त केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे लातूर-बार्शी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
धिरज देशमुख यांचा थेट मंत्र्यांना फोन
लातूर जिल्ह्याचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले., या सबबीखाली सोयाबीन खरेदीचे पोर्टल बंद झाले आािण जिल्ह्यातील ५४ केंद्रांवरील खरेदी ठप्प झाली. खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा आणि खरेदी ठप्प, अशी परिस्थिती होती. लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी लातूर तालुक्याताील नागझरी येथील विकास ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. च्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला भेट दिली. तेथून थेट राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधून सोयाबीन खरेदीबाबतची कैफियत मांडली आणि लातूर जिल्ह्याला वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्ह्यासाठी २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीला मंजुरी मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR