दर्यापूर : अमरावती जिल्ह्यातील लासूर येथे सोमवारी (दि.२) भीषण अपघात झाला. दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दर्यापूरचे तीन तरुण ठार झाले. तर, तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर दर्यापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
आनंद ऊर्फ गोलू बाहेकर (२६), विनीत गजानन बिजवे (३९, दर्यापूर), प्रतीक माधवराव बोचे (दर्यापूर) अशी मृतांची नावे आहेत. आकाश रमेश अग्रवाल, रमेश अग्रवाल (दोघेही रा. बाभळी, दर्यापूर) व पप्पू घाणीवाले (रा. बनोसा, दर्यापूर) अशी जखमींची नावे आहेत. मृतक हे कारने दर्यापूरहून अकोला येथे जात होते.
दर्यापूर ते अकोला मार्गावर लासूरनजीक विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारची धडक झाली. या अपघातात कारमधील आनंद बाहेकर, विनीत बिजवे आणि प्रतीक बोचे यांचा मृत्यू झाला. दुस-या कारमधून प्रवास करणारे आकाश रमेश अग्रवाल, रमेश अग्रवाल आणि पप्पू घाणीवाले (रा. बनोसा, दर्यापूर) हे जखमी झाले आहेत.