लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या कर्मचारी यांच्यासाठी सर्वरोग निदान तपासणी उपचार शिबीर घेण्यात आल. या शिबिरात बँकेच्या ५४७ कर्मचारी यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरकडून करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हणुमंत किणीकर, बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक एन. आर. पाटील, संचालक मारोती पांडे, संचालक जयेश माने, संचालक व्यंकटराव बिरादार, संचालक अनूप शेळके, संचालिका स्वयंप्रभा पाटील, अनिता केंद्रे, महेंद्र भादेकर, प्रभाकर केंद्रे, दयानंद बिडवे उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनीनिमीत्ताने बँकेच्या मुख्यालयात बँकेचे कर्मचारी, अधिकारी यांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. किणीकर त्यांच्या सहकारी टीम सर्वांची तपासणी केली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आदर्श बँक कर्मचारी संघटना व गटसचिव संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या रक्त्तदान शिबिरात बँकेच्या ६१ कर्मचा-यांनी उस्फुर्तपणे रक्त्तदान करुन लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या वर श्रद्धा असल्याचे दाखवून दिले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत साधारणत: १०० वेळा त्यापेक्षा अधिक रक्त्तदान शिबिर घेवून जवळपास ३,००० हजार बाटल्यांचे रक्त संक्रमण करुन गरजूंना रक्त देण्याचे काम बँकेच्या कर्मचा-यांंकडून झाले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्लड बँकेचे डॉ. उमाकांत जाधव यांची टीम बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.