17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेत प्रियंका गांधी यांचे पहिले भाषण, १० महत्त्वाचे मुद्दे

लोकसभेत प्रियंका गांधी यांचे पहिले भाषण, १० महत्त्वाचे मुद्दे

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज (शुक्रवारी) लोकसभेत पहिल्यांदा भाषण केलं. प्रियांका गांधी यांच्या लोकसभेतील पहिल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. प्रियांका गांधी यांनी म्हटले की, तुम्ही भूतकाळात किती दिवस जगणार आहात. सर्व जबाबदारी नेहरूंची आहे का? तुम्ही नेहमी जुन्याच गोष्टीवर बोलता, तुमच्याबद्दल कधी बोलणार?

प्रियांका गांधी यांनी शेतक-यांच्या प्रश्न देखील उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, उद्योगपतींसाठी शेतीविषयक कायदे केले जात आहेत. देशातील शेतकरी रडत आहेत. देशातील शेतक-यांचा देवावर विश्वास आहे. पण आज जे कायदे बनवले जात आहेत ते बड्या उद्योगपतींसाठी बनवले जात आहेत.
– लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी संविधानाबाबत बोलताना म्हटले की, भारतीय राज्यघटना हे आरएसएसचे संविधान नाही. ते केवळ कागदपत्र नाही. न्याय आणि आशेची ती ज्योत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा किंवा पाडण्याचा अधिकार दिला आहे. ही राज्यघटना न्यायाची हमी देते.
– प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जातीय जनगणनेची चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षातील सहका-याने तसा उल्लेख केला. निवडणुकीत जो निकाल आला त्यावर हा उल्लेख करण्यात आला.
– आजचे राजे वेश बदलतात, पण जनतेत जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. टीका ऐकण्याची त्यांच्यात ताकद नाही. आज देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पण भीती पसरवणारे स्वत: भीतीच्या सावटात जगत आहेत.
– लोकसभेत जर असा निकाल आला नसता तर भाजपने संविधान बदलले असते. पण देशातील जनताच संविधान सुरक्षित ठेवेल, हे या निवडणुकीत त्यांना कळून चुकले आहे. संविधान बदलण्याची चर्चा या देशात चालणार नाही, याची त्यांना जाणीव झाली.
– नेहरूंची देशासाठी मोठी भूमिका आहे. जी नाकारता येणार नाही. नेहरूंनी देशात अनेक सार्वजनिक उपक्रम सुरु केले. पण संपूर्ण जबाबदारी काय नेहरूंची आहे का? तुम्ही नेहमी जुन्या गोष्टींबद्दल बोलता, पण तुमच्याबद्दल कधी बोलणार.
– उद्योगपतींसाठी शेतीविषयक कायदे केले जात आहेत. पण या देशातील वायनाडपासून ललितपूरपर्यंतचा शेतकरी आक्रंदत आहे. शेतक-यांचा देवावर विश्वास आहे. पण देशात कायदे उद्योगपतींसाठी केले जात आहेत.
– अदानी प्रकरणावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारने सर्व कोल्ड स्टोरेज अदानींना दिले. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी देशातील १४२ कोटी जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. हे देश पाहत आहे. सर्व व्यवसाय, सर्व संसाधने, सर्व संपत्ती, सर्व संधी एकाच व्यक्तीकडे सोपवल्या जात आहेत.
– आज सरकार अदानींच्या नफ्यावर चालत आहे. गरीब तो अधिक गरीब होत आहे. श्रीमंत तो अधिक श्रीमंत होत आहे.
– तुम्ही महिला सक्षमीकरणाचा कायदा आणला, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही. आजची स्त्री १० वर्षे त्याची वाट पाहत बसणार का?
– सरकार खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR