22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रवाढत्या तापमानामुळे मुतखड्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ

वाढत्या तापमानामुळे मुतखड्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ

पुणे- उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मुतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मुतखड्यामुळे संबंधित व्यक्तींमध्ये आढळतात.

पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मुतखडा हा लघवीमधून वेगळ्या होणा-या कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झॅलेटसारख्या विशिष्ट क्षारांच्या स्फटिक कणांपासून बनलेले कडक पदार्थ असतात. या खड्यांचा आकार काही सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. काही खडे कोणत्याही उपचाराशिवाय स्वत:हून विरघळतात तर मोठ्या खड्यांना मात्र शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR