22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरविधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा येथे प्रशिक्षण

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा येथे प्रशिक्षण

औसा :  प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून   पुर्वतयारी अनुषंगाने शुक्रवारी औसा येथे क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय आधिकारी यांचे प्रशिक्षण  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार घनश्याम अडसूळ व नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
औसा विधानसभा मतदारसंघांतर्गत ३०९ मतदान केंद्र असून असून त्यासाठी एकूण ३२ झोनची निर्मिती करण्यात आली आहे व ३२ क्षेत्रीय अधिकारी व ३२ पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे एका क्षेत्रीय अधिकारी यांचेकडे १० ते १२ मतदान केंद्राची मतदान केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे हे झोनल अधिकारी प्रत्येक मतदान केंद्राना भेटी देऊन ५ी’’ल्ल४१ुं’ी स्रङ्म’्रल्लॅ स्टेशन मैंिपग (असुरक्षीत मतदान केंद्राचे मैंिपग) करणार आहेत. मागील सार्वत्रिक निवडणूक तसेच स्थानिक स्वराज संस्था निवडणूक दरम्यान कुठे अनुचित प्रकारकिंवा निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने काही गुन्हे दाखल असतील तर या बाबत तपासणी करुन असे मतदानकेंद्र, गाव ,ठिकाण निश्चित  करण्यात येणार आहे
त्याचबरोबर मतदार संघातील सर्व मतदान केंद्र इमारतीची पाहणी करुन तिथे पायाभूत सुविधा जसे पाणी, लाईट, फर्निचर, रैंप,स्वछता गृह आहेकिंंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. औसा विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी ३०/८/२४ रोजी प्रसीद्ध झाली असून त्यानुसार एकूण ३,०१,८२५ मतदार असून यामध्ये १,५९, ६२९ पुरुष १,४२, १९२ महिला ४ इतर मतदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुक आचारसंहिता अंमलबाजणीसाठी ५ स्थिर निगराणी पथक, ६ भरारी पथक, ३ व्हीडीओ पथक, १ खर्च पथक, नेमण्यात येत आहे. ३०९ मतदान केंद्रावर १६०० मतदान अधिकारी ४५० पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR