जालना : प्रतिनिधी
मी जर धमकी दिली तर महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंना दिला आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मी मराठवाड्यात जाणार. जरांगे काय करतो बघू, असे विधान केले होते. या विधानाचा जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणेंना बोलायला लागलो तर मागे सरकरणार नाही, विनाकारण मला डिवचू नका. माझ्या नादाला लागू नका असे जरांगे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे उगाच माझ्या नादाला लागू नका, इतर कोणाच्या पण नादाला लागा पण माझ्या नादाला लागू नका. देवेंद्र फडणवीसांनी आता नवा नेता निवडला का मराठ्यांच्या अंगावर जाण्यासाठी, मराठ्यांच्या नादाला लागू नका, मी जर धमकी दिली ना तर कुठेच फिरता येणार नाही,
मराठवाड्यातसुद्धा. देवेंद्र फडणवीस एकटा नाही असे विधान करताय, म्हणजे तुम्ही सोबत आहात. काय करणार आहात तुम्ही मराठ्यांना. मराठ्यांची फौज गोळा केली तर सुपडासाफ होईल. मस्तीत सत्तेचा गैरवापर करू नका. एकही जागा येऊ देणार नाही. शिस्तीत काम करा, असा दमच जरांगेंनी फडणवीसांना भरला आहे.