लातूर : प्रतिनिधी
व्ही. एस. पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके हे दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात होणा-या कार्यक्रमात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या सहकार्यांसह वंचित बहुजन आघडीत प्रवेश करणार असल्याची माहिती विनोद खटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्ही. एस. पँथर्सच्या माध्यमातून आतापर्यंत पाच सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळे, अनेक रक्त्तदान शिबिरांचे आयोजन, स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत हजारो विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याबरोबरच विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर मोर्चे, धरणे आंदोलने केली. आता वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहूजन आघाडीत प्रवेश करणार असल्याचे विनोद खटके म्हणाले. याप्रसंगी सचिन मस्के, अमोल सुरवसे, किरण पायाळ, प्रतिक कांबळे, आनंद जाधव, विखार अलताब देशमुख, असदभाई शेख, राहुल कांबळे, किरण केंद्रे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.