पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राज ठाकरेंसोबत त्यांचं पुन्हा जमेल की नाही अशी चर्चा होती.
दरम्यान वसंत मोरे यांनी आजही आपली निष्ठा राज ठाकरेंसोबत असल्याचे दाखवून दिले आहे. शर्मिला ठाकरे या मला मातोश्रीसमान आहेत. त्यामुळे पुण्यात निवडून आल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्की जाणार असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.