पानमंगरुळ (प्रतिनिधी): जागतिक संघटनेच्या निर्देशाप्रमाणे ९ थीम १७ गोल्स संकल्पना मनात ठेवून शाश्वत विकासाचा ध्येय ठेवून गावचा सर्वागीण विकास करणे हा हेतू ठेवून प्रत्येक नागरिकांनी लोकसहभागात भाग घेणे गरजेचे असते असे आवाहन अक्कलकोट पंचायत समितीचे बीडीओ शंकर कवितके यांनी पानमंगरुळकरांना केले.
महात्मा गांधी जयंती निमित्त सक्षम पंचायत विकसित भारत. देशातील ७५० ग्रामपंचायतीची निवड केली होती. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ ग्रामपंचायतीचा समाविष्ट करण्यात आला होता. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रत्नाबाई धोंडप्पा महाजन या होत्या.
अभियानाचा मुख्य संकल्पनेनुसार नशामुक्त भारत व निरोगी भारत, ज्येष्ठांचा सन्मान, स्वच्छता हिच सेवा याबाबन प्रतिज्ञा देण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आले. आंगणवाडी कडून अक्षरज्ञान स्टॉल ठेवण्यात आला होता. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले व पुरस्कार प्राप्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे यांनी जेष्ठांचा महत्त्व व आमचा गाव आमचा विकास याविषयी मार्गदर्शन केले. सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामस्थांच्या सहयोगाने प्रभात फेरी काढण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे निती आयोग समन्वयक प्रिती रोकडे, नोडल अधिकारी निकिता गायकवाड, ग्राविअ शिवानंद सोलापूरे, उपसरपंच मलिक मुजावर, महादेव महाजन, अकबर मुजावर, उदय नानजकर, सतिश पवार, अशपाक मुजावर, रियाना मुजावर, ललिता उडासे, सचिन बनसोडे, अण्णप्पा अरबाळे, सुगलाबाई कत्ते, श्रीदेवी पुजारी, जयश्री पवार, सिद्धव्वा बनसोडे, महादेव सुंकद, रेखा मुडगी आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी पटेल, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर्स, बचत गट महिला, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे व आभार ग्राविअ शिवानंद सोलापुरे यांनी मानले.
कृष्णात कदम, शहाजी पवार, सिद्धाराम ठमके (जेष्ठ नागरिक), सुभाष मंगरुळे, हरिश्चंद्र गायकवाड, शिवबाळ मुली, रमेश कत्ते, अकबर मुजावर, जिलानी मुजावर( सेवानिवृत्त अधिकारी व शिक्षक), मुख्याध्याप सी. बी. पुजारी, महादेव जंबगी, सिध्दू मुली).यांचा सन्मान करण्यात आला.