27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनशिल्पा शेट्टीला जुहूचा बंगला सोडण्याची ‘ईडी’ची नोटीस

शिल्पा शेट्टीला जुहूचा बंगला सोडण्याची ‘ईडी’ची नोटीस

 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा यांना मुंबईतील जुहू भागात असलेला त्यांचा आलिशान बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली आहे.

कथित क्रिप्टो अ‍ॅसेट पॉन्झी स्कीम प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्रीचा हा बंगला तसेच पवना तलावाजवळील फार्म हाऊस तात्पुरते जप्त केलं आहे. आता या दांम्पत्याला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीला शिल्पा आणि राज यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नोटीसमध्ये ईडीने मुंबईतील घर आणि पुण्यातील फार्म हाऊस १० दिवसांत रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयात दिलेल्या अर्जात शिल्पा आणि राज यांनी ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, २०१८ ते २०२४ दरम्यान ईडीने पाठवलेल्या सर्व समन्सला आम्ही उत्तर दिले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR