22.1 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिवशाही बस-कारचा भीषण अपघात, ३ ठार

शिवशाही बस-कारचा भीषण अपघात, ३ ठार

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. शिवशाही बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे. कारमधील वाणी कुटुंब जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून, पुढील तपास सुरू केला आहे. तर यातील एकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता निघाली. दरम्यान ही बस वाटेत असताना चोपडापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या सूतगिरणीजवळ समोरून येणा-या कार आणि बसचा जोरदार अपघात झाला.

यावेळी कारमधील तिघांचा जागेवर मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR