17.6 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeलातूरशेतक-यांना पीक विम्याचा लाभ न मिळवू देणा-या महायुतीचा हिशेब करा 

शेतक-यांना पीक विम्याचा लाभ न मिळवू देणा-या महायुतीचा हिशेब करा 

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा न मिळू देणा-या भाजपा महायुती सरकारचा .िद २० नोव्हेंबर रोजी महायुतीच्या विरोधात मतदान करुन शेतकरी, शेतमजूर आणि माता, भगिणींनी हिशेब करावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअमरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कॉग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार धिरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, रामेगाव, चिंचोली (ब), येथे दि. १८ नोव्हेबर रोजी आयोजित पदयात्रा व महिला सुसंवाद बैठकीत श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. याप्रसंगी सुनिताताई अरळीकर, लताताई काटे, आशाताई काटे, साधना मगर, सोनम देशमुख, भाग्यश्री देशमुख, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतक-यांची आर्थिक उन्नती व जीवन व  समृद्ध व्हावे यासाठी विलासरत्न विलासराव देशमुख व बब्रुवान काळे यांनी मांजरा कारखान्या बरोबरच मांजरा नदीवर जागोजागी बराज बांधून शेतक-यांचे आर्थिक परिस्थिती सुधावली आहे. त्यातून शेतकरी, कष्टकरी, मजूर आदीचे उत्पन्न वाढले आहे, असे  श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या.
२० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. तमाम मतदार धिरज देशमुख यांना या दिवशी आशिर्वाद देणार आहेत, याची मला खात्री आहे, असे नमुद करुन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, महायुती सरकारने मागील साडेसात वर्षात अनेक योजनांचा घोषणा केली, मात्र त्यांनी कुठलीच योजना राबवली नाही. मोदी यांच्या केंद्र सरकारनेही विदेशातील पैसा आणुन प्रत्येकांच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वास दिले होते. सत्ता येताच त्यांनी आश्वासन सोडून दिले. युवकांनाही भूलथाप मारली. वर्षाला २ कोटी नोक-यांचे काय झाले, महिला सुरक्षा धोक्यात आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. युवक बेकार फिरत आहेत. कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला, शेतक-यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकरी अडचणीत आहेत. महायुतीचे सरकार मात्र मस्तवाल पणाने या सर्वच प्रश्नाकडे डोळे झाक करीत आहे. मतदारांनी बुधवारी धिरज देशमुख यांच्या नावापूढील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून महायुती सरकारला जोरात झटका द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बबीता चव्हाण, तळाबाई राठेड, सरीताबाई चव्हाण, पुजा राठोड, वनिता चव्हाण, कांताबाई चव्हाण, धोंडाबाई जाधव, सारीका राठोड, सुरेखा राठोड, सुगरबाई राठोड, सुमनबाई राठोड, मिरा राठोड, जमुना आडे, यमुना चव्हाण, विमल जाधव, पुतळाबाई राठोड, स्नेहलताई देशमुख, शिलाताई मगर, कोमल मगर, साक्षी मगर, अनिता मगर, विमल  मगर, मिना देशपांडे, कमल शिंदे, विजयमाला मगर, शोभा मगर, शिलाबाई मगर, आशा मगर, शिंधू मगर, सुचिता मगर, अश्विनी मगर, रागिणी आदमाने, सत्यभामा पिसाळ, अस्मिता शिंदे, मधुबाला वाघमारे, कमलबाई चौधरी, जयवंता चौधरी, वंदना घणगावकर, छाया घणगावकर, रमा घणगावकर, मनिषा सोनवणे, राधा ढवारे, वर्षाराणी कापसे, जयश्री घणगावकर, इंदुबाई कापसे, सोनु घणगावकर, प्रभावती जाधव, छाया माने, सुंदरबाई जाधव, रेणूका वाघमारे, लक्ष्मी घणगावकर, कौशल्या भंडगे, विमल भंडगे, गौळण सोनवणे यासह आदि महिला व कॉग्रेस पक्षाचे कार्यकते व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR