औसा : प्रतिनिधी
तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या गळीत हंगामात १८ डिसेंबरपर्यंत कारखान्याचे २० हजार ६९० मे टन ऊसाचे गाळप झाले असून दि १० डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ११ हजार ५०० मे टन ऊसाचे गाळप केले आहे. दि १० डिसेंबर २०२४ पर्यंतच्या ऊसास उचल म्हणून प्रति में टन रु २७०० रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम मांजरा साखर परिवाराच्या धोरणाप्रमाणे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे अशी माहिती प्र कार्यकारी संचालक आर. बी. बरमदे यांनी दिली.
कारखान्याचा अंतिम भाव हा परिवाराच्या पंरपरेप्रमाणे सर्वात्तम राहील व बिलेही वेळेत दिले जातील. तेव्हां सदरची ऊस बिलाची रक्कम संबधीत शेतक-यांनी आपल्या नजीकच्या बॅक शाखेतून प्राप्त करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील व सर्व संचालक मंडळाने केले आहे. श्री संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंड या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२४-२५ दि २९-११-२०२४ रोजी सुरू होऊन दि. १८-१२-२०२४ रोजी कारखान्याचे २० हजार ६९० में टन गाळप होऊन १९ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम नियमित सुरू झाला आहे. मागील गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसास प्रत्येक १० दिवसांनी ऊस बिल ऊस उत्पादकाचे खात्यावर वर्ग केले आहे. त्या प्रमाणे चालू गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या दि १० डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ११५०० मे टन ऊसाचे गाळप केले आहे.
त्या ऊस बिलापोटी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने यशस्वी वाटचाल केली आहे. कारखान्याचा अंतिम भाव हा परीवाराच्या पंरपरेप्रमाणे सर्वात्तम राहील व बिलेही येळेत दिले जातील. तेव्हां सदरची ऊस बिलाची रक्कम संबधीत शेतक-यांनी आपल्या नजीकच्या बैंक शाखेतून प्राप्त करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील व सर्व सन्मा संचालक मंडळाने केले आहे.
चालू गळीत हंगामास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने कारखान्याने स्वमालकीचे ९ तोडणी मशिन यंत्र (हार्वेस्टर) खरेदी केल्यामुळे सर्व सभासद/बिगर सभासद ऊस उत्पादकांची ऊस तोडणीची कुचंबना थाबंली असुन उत्तम प्रकारचा स्वच्छ ऊस पुरवठा करणे अत्याधुनिक प्रकारच्या हार्वेस्टर मशिन यंत्रामुळे शक्य झाले आहे. तेव्हा नेहमी प्रमाणे सर्व सभासद बिगर सभासद ऊस उत्पादकांनी आपला परिपक्व ऊस कारखान्यास गाळपास द्यावा, अशी विनंती संचालक मंडळाने केली आहे.