लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील फातिमा कॉन्व्हेंट सीबीएससी स्कूल मध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या श्रीजीत संजय बुच्चे वयाच्या ८ व्या वर्षी, पोलीस मॅरेथॉन स्पर्धेमध्ये न थांबता १० किलोमीटर अंतर पार केले होते. पोलीस मेडल प्राप्त करून फातिमा कॉन्व्हेंट सीबीएससी स्कूलचे नाव रोशन केले आहे.
श्रीजीच्या यशाबद्दल २० डिसेंबर रोजी फातिमा कॉन्व्हेंट सीबीएससी स्कूल लातूरच्या वतीने अॅनिवल डे च्या निमित्त मान्यवर प्रिन्सिपल प्रतिभा मिस यांच्या हस्ते श्रीजीत संजय बुच्चे यास स्पोर्ट प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्रीजीतला सन्मान प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, विवेकानंद चौक पोलीस निरीक्षक, सुधाकर बावकर, पत्रकार अजय कल्याणी, दैनिक एकमतचे उपसंपादक राजहंस कांबळे, मेटु भालेराव, अंशू शिंदे, रितिका रेड्डी, मयुरी रेड्डी, सुजे, अर्जुन कलकत्ते, अथर्व तोरे, रोहित पाटील, हिमांशू आदींनी कौतुक केले आहे.