24.5 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत बिना अभ्यासाचे आकाशवाणी केंद्र

संजय राऊत बिना अभ्यासाचे आकाशवाणी केंद्र

अमरावती : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यात होऊ घातलेल्या तिस-या आघाडीला फटकारले होते. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणजे, शिवसेनेचे ब्रेकिंग देणारे बिना अभ्यासाचे आकाशवाणी केंद्र आहे. ते काही पूर्ण महाराष्ट्राचे पीआर कार्ड नसून, त्यांचा अभ्यास कमी आहे. तिसरी आघाडी महाशक्ती म्हणून समोर येणार असून, मुख्यमंत्री महाशक्तीचा होईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज्यात बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टींच्या तिस-या आघाडीवर टीका केली. आमदार बच्चू कडू यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे पु-या महाराष्ट्राचे पीआर कार्ड नाही. ते शिवसेनेकडून ब्रेकिंग देणारे आकाशवाणी केंद्र आहे.

याशिवाय संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे. ते जहागिरदार नाहीत, तर महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने उभा राहिलेला दिसेल. तिस-या महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला. आमची महाशक्ती पु-या देशात आदर्श ठरेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देऊ आणि २८८ जागा पूर्ण देऊ असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांना मी चांगलं मानत होतो. पण त्यांना माहीत नाही की, दिल्लीत तिसरा पक्ष आला. तिस-या पक्षाने उभेच राहू नये, असे वाटत असेल, तर चुकीचे आहे. भाजप किंवा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी काय महाराष्ट्र खरेदी केला का?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR