औसा : प्रतिनिधी
युवकांनी तेजस्वीता, तत्परता व तपस्वीता या तीन गुणांचा अंगीकार केला पाहिजे आणि न्यूनगंड, नकारात्मकता व निराशा या तीन गोष्टी युवकांमध्ये नसल्या पाहिजेत. पैसा, मोबाईल व आरोग्य या मानवाच्या मुलभूत गरजासोबतच संवाद ही एक महत्वाची मुलभूत गरज आहे, असे प्रतिपादन दूरर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांनी केले.
शिवंिलगेश्वर कॉलेजऑफ फार्मसी व दगडोजीराव देशमुख डी.फार्मसी महाविद्यालयातील महिला सशक्तीकरण विभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संवाद व मागदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होते. केळकर म्हणाल्या की, युवकांनी चांगल्या सुसंगत मार्गाचा अवलंब करावा. चुकीच्या मार्गावर जाऊ नये सत्य सौम्य पद्धतीने सांगावे यासाठी कुशलता व चतुरता लागते. एखाद्या व्यक्तीचे गुण हे सर्वासमोर सांगावे आणि दोष मात्र त्या एकट्या व्यक्तीला सौम्य पध्दतीने सांगावे. आपल्या वाणीचे काही दोष आहेत त्यामध्ये एखाद्याचा दोष करणे, टिका करणे, आराडा ओरडा करणे, असत्य बोलणे,एखाट्याच्या मर्मावर बोट ठेवणे व उगाचाच एखाद्याचा विरोध करणे, अशा वक्तव्याबद्दल विस्ताराने मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव बसरावज धाराशिवे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, योगेश धाराशिवे, शिवकांता धाराशिवे, दिपमाला धाराशिवे, मेघा धाराशिवे, डॉ. अनुराधा धाराशिवे, डॉ. कैलास कापसे, संचालक जयशंकर हुरदळे, माजी सरपंच कैलास निलंगेकर, अमर हजारे, प्रा. दिनेश गुजराथी, डॉ समीर शफी, डॉ. सुरज मालपाणी, डॉ. सचिन हंगरगेकर, डॉ. अजय फुगटे, विकास मुगळे, कार्यक्रमाच्या समन्वयक विद्या कापसे हे उपस्थित होते.
फार्मसी कौन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी फार्मसी इन्सपेक्टर म्हणून मान्यता दिलेले प्रा. दिनेश गुजराथी, डॉ. समीर शफी व डॉ. सुरज मालपाणी यांचा सत्कार दिपाली केळकर व संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच एम.फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे पुस्तक कम्प्युटर अॅडेड ड्रग डिजाईन’ पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी चंद्रवंशी यांनी केले तर आभार डॉ. समीर शफी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.