नवी दिल्ली : भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे मी जखमी झालो, असे भाजप खासदार सारंगी यांचा दावा आहे. मी पाय-यांवर उभा होतो. राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो खासदार माझ्या अंगावर पडला. त्यामुळे मी पडलो आणि जखमी झालो, असा दावा प्रताप सारंगी यांनी केला.
प्रताप सारंगी यांच्या आरोपावर राहुल गांधी म्हणाले, ‘हो, मी केलय, ठीक आहे. धक्का-बुक्कीने काही होत नाही. मला संसदेच्या आता जायचे होते. संसदेत जाणे माझा अधिकार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. मला संसदेत आत जाण्यापासून रोखण्यात आले. भाजप खासदार धक्काबुक्की करत होते’.
निळे वादळ : अमित शाह यांच्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. या संबंधी आज इंडिया आघाडी प्रोटेस्ट मार्च काढण्यात आला. राहुल गांधी निळे टी-शर्ट, प्रियंका गांधी यांनी निळी साडी तर इंडिया आघाडीचे सदस्य निळे वस्त्र परिधान करून सामिल झाले होते. राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधान केलं. त्या वक्तव्याविरोधात अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीने केली. त्यासाठी हा प्रोटेस्ट मार्च झाला. संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासून मकर द्वारपर्यंत हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात आला.