30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रसत्ता पुन्हा खेचून आणणार, तुम्हाला न्याय देणार

सत्ता पुन्हा खेचून आणणार, तुम्हाला न्याय देणार

कोपरगाव : प्रतिनिधी
मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार, असा शब्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचा-यांना दिला आहे. कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही योजना राबवता आणि हे फुकटसुंभ त्याचे श्रेय घेतात. कोरोना आला नसता तर तुम्हाला असे जमण्याची वेळ आली नसती. काही योजना चांगल्या आहेत. मात्र तिजोरीकडे पाहिले जात नाही. निर्मला सीतारामन यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, असे लोकसभेत म्हटले.

त्यामुळे यांनी जरी घोषणा केली तरी तुम्हाला काही मिळणार नाही. दिल्लीला विचारल्याशिवाय हे काहीच करू शकत नाहीत. तुम्हाला हवी तशी पेन्शन योजना आम्ही सत्तेत आल्यावर देणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR