लातूर : प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचा-यांचे त्यांच्या कायम करण्या संदर्भात व विविध मागण्यासाठी दि. ४ मार्च पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. विविध संघटनेच्या पदाधिकारी केंद्रप्रमुख संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना , कास्ट्राईब संघटना इत्यादी संघटना यांचे पदाधिकारी प्रत्यक्ष येऊन सदर अमरण उपोषणास पाठिंबा दिला आहे.
तसेच तालुक्याचे त्या-त्या कार्यक्षेत्रातील १७ आमदार यांनी पहिल्या दिवशी प्रत्यक्ष उपोषण कर्त्यास भेट देऊन मार्गदर्शन केले व आपला प्रश्न विधान भवनात सकारात्मक रित्या मांडण्यात येईल असे आश्वासनही दिले. दि. ४ मार्च रोजी सर्व जिल्ह्यातील मिळून साधारणत: १ हजार ५६४ कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. दि. ५ मार्च रोजी सर्व जिल्ह्याची मिळून २ हजार ५६४ हून अधिक कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. सदरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व अन्य आमदार यांनी आझाद मैदान मुंबई येथे जाऊन उपोषण करणारे कंत्राटी बंधू-भगिनी यांची भेट घेऊन. शासनाने याबाबत नियुक्त केलेल्या समितीची बैठक घेऊन सदरचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन देत लवकरच याबाबत समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.