23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसमतावादी सांस्कृतिक चळवळीने लातूरचा सर्वोत्कृष्ट बेस्ट वक्ता निवडला 

समतावादी सांस्कृतिक चळवळीने लातूरचा सर्वोत्कृष्ट बेस्ट वक्ता निवडला 

लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लातूर येथील समतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतून लातूरचा सर्वोत्कृष्ट बेस्ट वक्ता म्हणून येथील केशवराज विद्यालयाची गायत्री राजेंद्र जाधव (प्रथम) या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रकाश घादगीने यांच्या अध्यतेखाली झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय निकीता माधव राजगुरु(सरस्वती विद्यालय) तर तृतीय क्रमांक मैथीली महेश जाधव (मारवाडी राजस्थान विद्यालय) यांनी पारितोषिकं पटकावली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मन्मथराव भातांब्रे, कला पंढरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. पी. सुर्यवंशी, आदर्श शिक्षीका वंदनाताई गादेकर, पी. के. सावंत, छगन गायकवाड आदींची उपस्थिती होती.
शहरातील तब्बल २४ शाळांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर बेस्ट वक्ता ठरलेल्या विजेत्यांना प्रथम क्रमांक १००१, द्वितीय क्रमांक ७०१ तर तृतीय क्रमांक ५०१ रुपये रोख रक्कम सन्मान पत्र व शाल बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांनी केले सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार डॉ. उमाकांत जाधव यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR