25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर अपघात; १ ठार, १५ जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात; १ ठार, १५ जखमी

अमरावती : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात पुण्याहून नागपूरकडे जाणा-या लक्झरी बसची धडक ट्रकला झाली. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना अमरावतीच्या जवळ असणा-या धामणगावजवळ पहाटेच्या सुमारास घडली.

घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

लक्झरीचा चालक ठार
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणा-या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला आहे. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून जवळपास १५ जण यात जखमी झाल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR