23.6 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडासरफराजला पुत्ररत्न

सरफराजला पुत्ररत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीमध्ये पहिले शतक झळकावणारा बॅटर सरफराज खान याच्या घरात पाळणा हलला आहे. सरफराजची पत्नी रोमाना जहूर हिने सोमवारी रात्री मुलाला जन्म दिला. सरफराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.

सरफराज खान आणि रोमाना जहूर यांचा ६ ऑगस्ट २०२३रोजी निकाह झाला होता. रोमाना जम्मू-कश्मीरमधील शोफिया जिल्ह्यातील पशपोरा गावची रहिवासी आहे. या दोघांची पहिली भेट दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर झाली होती. सरफराजच्या भावाने दोघांची भेट घडवून आणली होती.

रोमाना दिल्लीत एमएससीची तयारी करत होती आणि सरफराजचा भाऊ तिच्याच वर्गात होता. दरम्यान, बंगळुरू कसोटीमध्ये सरफराज खान याने दमदार फलंदाजी केली. एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या कसोटीत सरफराजने कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. हा सामना पाहण्यासाठी सरफराजची पत्नी रोमाना ही देखील बंगळुरुच्या मैदानावर उपस्थित होती.

पहिल्या डावात फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती. सरफराजही विशेष काही करू शकला नव्हता. मात्र दुस-या डावात न्यूझीलंडची मोठी आघाडी मोडून काढण्यात त्याने मोलाचे योगदान देत १९५ चेंडूत १५० धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR