20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसायबर फ्रॉडमध्ये १७० सामिल; पुण्यासह ३२ छापे, २६ जेरबंद

सायबर फ्रॉडमध्ये १७० सामिल; पुण्यासह ३२ छापे, २६ जेरबंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील आणि जगभरातील नागरिकांना जाळ्यात ओढून पैसे लुबाडणा-या सायबर गुन्हेगारी नेटवर्कविरोधात सीबीयआने कारवाई केली. सीबीआयने २६ सप्टेंबर रोजी देशभरातील ३२ ठिकाणी छापे टाकले. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून लोकांना फसवून पैसे लुबाडणा-या नेटवर्कमध्ये १७० जण सहभागी असल्याचे समोर आले असून, २६ प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयने पुण्यातून १० जणांना अटक केली.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि विशाखापटणमधील ३२ ठिकाणी छापे टाकले. २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हे छापे टाकण्यात आले.

सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये असे आढळून आले की, चार कॉल सेंटर्सच्या माध्यमातून १७० लोक या ऑनलाईन गुन्हेगारीच्या प्रकरणात सहभागी आहेत. यात प्रमुख आरोपी असलेल्या २६ जणांना सीबीआयने अटक केली.

सीबीआयने अटक केलेल्या प्रमुख आरोपींपैकी १० जणांना पुण्यातून अटक करण्यात आली. हैदराबादमधून ५ आरोपी आणि विशाखापटणममधून ११ आरोपींना अटक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR