25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरसिद्धाराम म्हेत्रे यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज

सिद्धाराम म्हेत्रे यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज

सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार व सोलापुर शहर कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापुर येथे सुपूर्द केला.

यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील,जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी,माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड,आनंदराव सोनकाबंळे,पं सदस्य धनेशजी अचलारे, तुकाराम कोळेकर,विश्रांत गायकवाड,शंकर येणेगुर,जगदिश अटंद,विजय राठोड,नागराज पाटील,सुनील देवकर,माजी नगरसेवक लाला राठोड,सद्दाम शेरीकर,

युवक काँग्रेस ता अध्यक्ष बाबासाहेब पाटील,विजय राठोड,विश्वनाथ भरमशेट्टी,व्यकंट मोरे,सिद्धाराम भंडारकवठे,अश्फाक अगसापूरे,विनीत पाटील,मैनुद्दीन कोरबु, सोमनाथ चिकलंडे,बाबु राठोड,शाकिर पटेल,इरण्णा दसाडे,नाना नदाफ,नितीन ननावरे,परिक्षीत चौगुले,आदिसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR