लातूर : प्रतिनिधी
अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या अनुदानित वसतिगृहांना अचानक भेटी देऊन तपासणी केली.
या तपासणीत वसतिगृह अधिक्षकांना विविध प्रकारच्या सुचना सागर यांनी केल्या. यात तक्रार पेटी ठेवणे, तक्रारींच्या नियमितपणे नोंदी ठेवणे व निरसन करणे. वसतिगृहात स्वच्छता ठेवणे, वसतिगृहात पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवणे बाबत व वसतिगृह अभिलेखे अदयावत ठेवणे बाबत वसतिगृह व्यवस्थपनास आदेशित केले. तसेच समाज कल्याण निरीक्षक, जिल्हा परिषद, लातूर व संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर दर्शनी भागात डकविणे बाबत सुचना दिल्या. तसेच कोणतीही तक्रार असल्यास त्यांना संपर्क करणे बाबत विद्यार्थ्यांना सुचना दिल्या. तपासणीवेळी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद लातूर व अंकुश बिरादार, समाज कल्याण निरीक्षक, जिल्हा परिषद, लातूर यांची उपस्थिती होती.