लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दि. ४ ते १७ डिसेंबरदरम्यान पार पडली. या प्राथमिक फेरीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान लातूरचे ‘परफेक्ट मिसमॅच’ नाटक प्रथम आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे लातूर केंद्रावरील अन्य निकाल या प्रमाणे आहेत. अभयरत्न सामाजिक विकास संस्थेचे चाफा सुगंधी या नाटकास द्वितीय पारितोषी तसेच सह्याद्री प्रतिष्ठान लातूर या संस्थेच्या पुन्हा पुन्हा मोहोंजोदारो या नाटकासाठी तृतीय पारितोषीक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शक प्रथम पारितोषीक संजय अयाचित (नाटक- परफेक्ट मिसमॅच), द्वितीय पारितोषीक प्रदीप भोकरे (नाटक-चाफा सुगंधी), प्रकाश योजना प्रथम पारितोषीक गणेशसिंग मरोड (नाटक-चाफा सुगंधी), द्वितीय गणपत वेणुगोपाल कुलकर्णी (नाटक-परफेक्ट मिसमॅच), नेपथ्य प्रथम विवेक मगर (नाटक- पुन्हा पुन्हा मोहोंजोदारो), द्वितीय मल्लेश्वर कौटूंबे (नाटक चाफा सुगंधी).
रंगभुषा प्रथम हिरा वेदपाठक (नाटक चाफा सुगंधी), द्वितीय भारत थोरात (नाटक सभ्य गृहस्थ हो…), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक डॉ. मुकूंद भिसे (नाटक परफेक्ट मिसमॅच) व डॉ. भाग्यश्री कुलकर्णी (नाटक परफेक्ट मिसमॅच). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ऋतूूजा सूर्यवंशी (नाटक चाफा सुगंधी), अर्पणा गोवंडे (नाटक खेळ), श्रेया कुलकर्णी (नाटक मी कुमार), सरस्वती कारभारी (नाटक चाफा सुगंधी), व्यंकट येलाले (नाटक सभ्य गृहस्त्थ हो…), डॉ. गणेश प्रधान पोतदार (नाटक खेळ), राजू गड्डीमे (नाटक पुन्हा पुन्हा मोहोंजोदारो), डॉ. अशोक आरदवाड (नाटक सभ्य गृहस्थहो…).
मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात अतिश्य जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकुण ११ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन गजानन कराळे, हेमराज भगत आणि मधुरा टापरे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्पर्धेचे लातूर केंद्राचे समन्वयक बाळकृष्ण धायगुडे यांनी परिश्रम घेतले.