23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवार लवकरच राज्यसभेवर?

सुनेत्रा पवार लवकरच राज्यसभेवर?

मुंबई : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लवकरच राज्यसभेवर नियुक्ती केली जाणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते.

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संखेत राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवल्यास सुनेत्रा यांचा विजय सहज होईल अशी अटकळ बांधण्यात आली होती. लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याशीही अजित पवार यांनी जुळवून घेतले होते.

अशा परिस्थितीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी राजकीय टक्कर घेण्यासाठी सुनेत्रा यांची राज्यसभेवरची नियुक्ती मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR