23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीसेलू तहसीलवर धडकला शेतकºयांचा आक्रोश मोर्चा

सेलू तहसीलवर धडकला शेतकºयांचा आक्रोश मोर्चा

सेलू : महायुती शासनाने शेतकºयांना वाºयावर सोडले असून शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शहरातून आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी माजी आ. विजयराव भांबळे यांनी शेतीमालाला भाव आणि कर्जमाफी न केल्यास शेतकºयांचा रुमणे मोर्चा काढण्याचा इशारा आक्रोश मोर्चाच्या प्रसंगी बोलताना सेलू येथे दिला.

युती शासनाने शेतकºयांना वाºयावर सोडले असून त्यांच्या अनेक मागणी आहेत त्यापैकी किमान शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. तसेच शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी करत सेलू तहसीलवर महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करताना माजी आ. भांबळे यांनी शेतकºयांच्या विविध मागण्या मान्य झाल्या नाही तर रुमणे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा याप्रसंगी दिला. याप्रसंगी युती शासनाने शेतकºयांच्या तोंडाला पाणी पुसली असून मागील वर्षीच्या खरीप पिकांचा पिक विमा रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकºयांचा आक्रोश मोर्चा माजी आ.भांबळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. सेलू येथील टिळक यांच्या पुतळ्यापासून या शेतकºयांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदरचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी माजी आ. भांबळे, माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, अशोक काकडे, राम खराबे, नामदेव डख, पवन आडळकर पुरुषोत्तम पावडे आदींची उपस्थिती होती.

शेतकºयांना वेळेवर नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकºयांना वेळेवर विद्युत पुरवठा केला जावा आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेतकºयांना नाश्ता खिचडी व पाण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. या आक्रोश मोर्चात सेलू व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शेतकºयांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR