कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी १० हजार रुपये जमा होणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात घोषणा केली. खरीप हंगाम २०२३ मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक ६५ लाख शेतक-यांना २ हजार ५०० कोटी अर्थसहाय्य वितरीत होणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या खात्यात उद्याच रक्कम जमा होईल, असे मुंडे म्हणाले.
महाराष्ट्र कृषि विभागाकडून सन २०१०, २०२१ आणि २०२२ या वर्षात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शेतकरी आणि अधिका-यांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वरळी डोम येथे पार पडला. या कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली.
राज्यातील जवळपास ९६ लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांपैकी आधार लिंक असलेल्या ६८ लाख शेतक-यांना अनुदान मंजूर झाले आहे. यात प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये २ हेक्टर मर्यादेत म्हणजेच जास्तीत जास्त १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी उद्या ६५ लाख शेतक-यांना २५०० कोटींचे वितरण होणार आहे, असे मुंडे म्हणाले.