28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रहमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत : फडणवीस

हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत : फडणवीस

नाशिक : प्रतिनिधी
शेतक-यांच्या अडचणींची सरकारला जाणीव आहे. जर हमी भावापेक्षा बाजारभाव कमी झाले तर शेतक-यांना मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे निर्यात बंदी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही कांदा उत्पादक शेतक-यांना त्यांनी दिले.

चांदवड येथे आयोजित जाहीर सभेमध्ये त्यांनी महायुती सरकारने केलेल्या विविध कल्याणकारी कामांची तसेच शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली. चांदवड-देवळा मतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. राहुल आहेर कसे प्रयत्नशील आहेत, याचीही अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
स्मार्ट शेतकरी गरजेचा : स्मार्ट सिटीबरोबरच आता स्मार्ट शेतकरी गरजेचा आहे. शेतक-याला अन्नदाता नव्हे तर तो ऊर्जादाता, इंधनदाता करण्यासाठी महायुतीचे शासन कटिबद्ध असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी सटाणा येथील प्रचार सभेत केला.

वक्फ बोर्डच्या मालमत्तेसाठी कट : केंद्र सरकारकडून वक्फ बोर्डाचे विधेयक आणून वक्फची मालमत्ता हस्तगत करण्याचे षड्­यंत्र सुरू असून, ते हाणून पाडले जाईल, असे प्रतिपादन ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मालेगाव मध्य मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR