21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहायपरसॉनिक प्रक्षेपणास्त्राच्या ठिक-या इस्रायलने उडविल्या!

हायपरसॉनिक प्रक्षेपणास्त्राच्या ठिक-या इस्रायलने उडविल्या!

 

येरूसलेम : वृत्तसंस्था
येमेनमधून इस्रायलवर हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाइल पॅलेस्टाईन-२ ने हल्ला करण्यात आला. या मिसाईलसोबतच जुल्फिकार मिसाईलने सुद्धा हल्ला करण्यात आला. यामुळे मध्य इस्रायलमध्ये घबराट निर्माण होऊन एकच पळापळ सुरु झाली. लोक लपत होते. त्याचवेळी इस्रायलच्या एरो या एअर डिफेन्स सिस्टिमने या हायपरसॉनिक मिसाईलच्या ठिक-या उडविल्या. हे मिसाइल नष्ट केल्यानंतर त्याचे जळते तुकडे इस्रायलमध्ये पडले. त्यामुळे खूप वेळ सायरन वाजत होता.

लोकांना वाटलं की मिसाईलने टार्गेटला हिट केलं. जाफा आणि इलातमध्ये लष्करी टार्गेटला लक्ष्य केलं, असं हुती बंडखोरांकडून सांगण्यात आलं. जुल्फिकार मिसाईल कुठे कोसळलं? त्याचे डिटेल येमेनने दिलेले नाहीत. हुती बंडखोरांनी मागच्या एक वर्षात इस्रायलवर २२० पेक्षा जास्त बॅलेस्टिक, क्रूज मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. दक्षिण इस्रायली शहर इलातमध्ये बहुतांश हल्ले झाले. इस्रायलने सांगितलं की, ‘‘हुती बंडखोरांनी तीन मिसाईल्स डागली. दोन हवेतच नष्ट झाली. तिसरं मोकळ्या जागेत पडलं’’

काही दिवसांपूर्वी येमेनने पॅलेस्टाईन-२ हायपरसॉनिक बॅलेस्टिक मिसाइलद्वारे तेल अवीववर हल्ला केला होता. हे प्रक्षेपणास्त्र अवघ्या ११ मिनिटात २०४० किमी. अंतर कापून टार्गेटपर्यंत पोहोचले. या मिसाईलचा वेग दर ताशी १९७५६ किमी. आहे. इस्रायलच्या एरो एअर डिफेन्स सिस्टिमने वातावरणाच्या कक्षेतच हे मिसाईल उडवलं. या मिसाईलची रेंज २१५० किलोमीटर आहे. पॅलेस्टाइन-२ मिसाईल हवे मध्येच दिशा बदलू शकते. म्हणजे एअर डिफेन्स सिस्टिमच्या इंटरसेप्टर सिस्टिमला चकवा देऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR