लातूर : प्रतिनिधी
बांगलादेशात हिंदू समाजावर होणा-या अत्याचाराच्या विरोधात दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता येथील गंजगोलाईतून हिंदू हुंकार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध ‘हुंकार’ भरला. मोर्चा महिला व ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक संख्या होती.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. गंजगोेलाईतून हा मोर्चा निघाला. मेन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नमन करुन मोर्चाची सांगता झाली.
मोर्चात सहभागी युवक, युवती, महिला, पुरुषांनी भगवी टोपी परिधान केली होती. हाता भगवे झेंडे, फलक होते. बांगलादेशात हिंदू समाजावर होणा-या अन्याय, अत्याच्याराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘बांगलादेश में हिंदुओं के मानवाधिकार हननपर दुनिया चुप क्यों ?’, ‘हिंदुओं का विश्वास है सर्वे भवन्तु सुखिन’, ‘बांगलादेश में हिंदुओं पर अत्याचार बंद करो’, ‘बांगलादेश में दलित समाज पर अत्याचार बंद करो’, असे
घोष वाक्य लिहिलेले फलक मोर्चात सहभागी नागरिकांच्या हातात होते. मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चादरम्यान पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.